महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पश्चिम नागपूरतर्फे नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी डिग दवाखाना, गवळीपुरा, धरमपेठ येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत पार पडले.

54 
 
शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. तसेच गरजेनुसार मोफत शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.Chief Minister Devendra Fadnavis या उपक्रमाचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.या महाआरोग्य शिबिराचे संयोजक संदीप जोशी तर सहसंयोजक विनोद कन्हेरे होते. नगरसेवक विनय दाणी, सुनील हिरणवार आणि अभिषेक श्रीवास्तव यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.शिबिराला महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त शेरसिंग डागोर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
सौजन्य:अशोक माटे ,संपर्क मित्र