लंडन,
Confusion in London after victory over Morocco फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. फ्रान्समध्ये या विजयाचा उत्साहपूर्ण जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र, ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये या सामन्यानंतर हिंसाचार उसळल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. फुटबॉल चाहत्यांचे मोठे जमाव रस्त्यावर उतरले आणि काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम लंडनमधील एजवेअर रोड परिसरात जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर हल्ला झाला. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पोलीस अधिकारी मोठ्या जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काही दृश्यांमध्ये जखमी पोलीस अधिकाऱ्यावर वैद्यकीय पथक उपचार करत असल्याचे, तर इतर पोलीस दंगलखोरांना रोखण्यासाठी ढालींसह पुढे सरकत असल्याचे दिसून येते.या सामन्यापूर्वी फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता पॅरिसमध्येही तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यासाठी फ्रेंच प्रशासनाने मोठा सुरक्षा बंदोबस्त उभारला होता. संपूर्ण फ्रान्समध्ये २० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ८ हजार पोलीस केवळ पॅरिसमध्ये नियुक्त करण्यात आले होते. फ्रेंच सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य हिंसाचाराचा इशारा दिला होता. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवत पॅरिसमध्ये कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. हजारो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून फ्रान्सच्या विजयाचा शांततेत आणि उत्साहात आनंद साजरा केला. मात्र, लंडनमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे विश्वचषकाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.