दिव्यांग भाविकांच्या यवतमाळ-पंढरपूर पायी दिंडीचा सन्मान

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
पुसद, 
Divyang Yavatmal-Pandharpur Dindi श्रीज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे मंगळवारी सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने यवतमाळ-पंढरपूर जाणाèया दिव्यांग वारकरी दिंडीतील सहभागी दिंव्यांगाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य यजमान यांनी सर्व दिव्यांगाचे पाय धुवून सर्वांना मोत्याच्या माळा देऊन सन्मान केला. विशेष म्हणजे, यावेळी पुसद शहर ठाणेदार चव्हाण उपस्थित होते. त्यांनीही दिंडीतील भाविकांचा सन्मान केला. ही दिव्यांग भाविकांची दिंडी 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहचणार आहे. दररोज जवळपास 25 ते 30 किमी पायी प्रवास हे दिव्यांग, अंध भाविक अत्यंत भक्तीभावाने उत्साहाने सुरू असून दिंडीचे हे तिसरे वर्ष होय.
 
 
divyang
 
 
यावेळी या दिव्यांग भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यावतीने जिल्हा समन्वयक, कक्षप्रमुख डॉ. प्रसाद बनसोड व डॉ. अनिल पिसे यांच्या मार्गदर्शनात चरणसेवा प्रकल्प मोहीम करण्यात आली. यावेळी सर्व पायी चालणाèया भाविकांची चरण सेवा करण्यात आली. त्यांच्या पायाला तेल, मलम लावून पायाचे अतिशय श्रद्धेने मालिश करून आवश्यक उपचारही करण्यात आले.
या सेवाकार्यामध्ये आरोग्य भारती पुसद शाखा म्हणजेच संतश्री गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाची सेवाभावी चमू, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचेही सहकार्य लाभले.
 
 
यावेळी दिंडीचे संयोजक प्रशांत बनगिनवार, डॉ. प्रसाद बनसोड, डॉ. अनिल पिसे, आरोग्य भारतीचे प्रतिनिधी डॉ. रामकृष्ण साखरे व बजरंग दल प्रखंड मंत्री नारायण बोम्पिलवार यांचा संस्थानच्या वतीने पांडुरंगाची प्रतिमा देऊन संस्थानचे अध्यक्ष बिपीन चिद्दरवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी दिव्यांगांनी गायन करून सर्वांची मने जिंकली. यातील रिमा तोडकर या नेत्रहिन वारकरीला शासनाचा अतिशय महत्त्वाचा ‘व्हाईस ऑफ किंग’ हा पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. तिचाही संस्थांनच्या वतीने पांडुरंगाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.