वाढत्या लाईट बिलाने आर्णीकर त्रस्त

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
स्मार्टमिटर विरुद्ध शिवसेनेचे निवेदन

आर्णी, 
electricity bills आर्णी तालुक्यातील काही वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे. त्यावर वापरापेक्षा अधिक अवाजवी बिल येत असल्यामुळे ग्राहक त्रस्त झालेले आहेत. या संदर्भात शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. ज्याही ग्राहकांना वाढीव बिल आलेले असेल त्यांनी तक्रार करून आपले बिल कमी करून घ्यावे व स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवण्याची विनंती विद्युत महामंडळाला करावी यासाठी आर्णी येथे शिवसैनिकांनी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांना निवेदन दिले.
 
 
smart miter
 
निवेदन देताना अश्विन जाधव, जाकिर सोलंकी, विनय राठोड, अभिलाष इंगोले, संतोष राठोड, इमरान खान, सूरज राठोड, अलसिंग पवार, अंबादास शिंदे, राहुल पवार, विशाल राठोड, सावन चव्हाण, निलेश जाधव, पंडित काळे, गोपाल जाधव, बादल जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.