अमरनाथ यात्रेसाठी २६ भाविकांचा पहिला जथा रवाना

नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे व भक्तांकडून सत्कार

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मालेगाव, 
amarnath yatra हिंदू धर्मियांचे पवित्र आणि श्रद्धास्थान असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेला जाणार्‍या मालेगाव शहरातील २६ भाविकांच्या पहिल्या जथ्याला आज, १० जुलै रोजी अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जुने बस स्टँड परिसरातील हनुमान मंदिरासमोरून रवाना होणार्‍या या भाविकांचा नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे, स्थानिक नागरिक आणि भोलेभक्तांच्या वतीने पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला आणि त्यांना सुखकर यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
 

amarnath yatra 
 
 
मानवी जीवनात आणि हिंदू संस्कृतिक अमरनाथ यात्रेला अत्यंत विशेष आणि अलौकिक महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मालेगाव शहरातून अमरनाथ दर्शनाची ओढ असलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज शहरातून एकूण २६ यात्रेकरूंचा पहिला जथा मालेगावातून अमरनाथ धामकडे कूच करण्यासाठी सज्ज झाला होता. या भाविकांना निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी जुने बस स्टँड परिसरातील हनुमान मंदिरासमोर शिवभक्तांची व नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. याप्रसंगी नगराध्यक्ष ओम खुरसडे, मोहन बळी, महादेव खवले, बिरजू ठाकूर, मोहन बळी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सर्व २६ यात्रेकरूंचे पुष्पहार घालून स्वागत केले.
मालेगाव येथून रवाना झालेल्या पहिल्या जथ्यामध्ये महादेव घुगे, धीरज यादव, मुकुंदा सोनवणे, पांडुरंग नागरे, वासुदेव भांदुर्गे, गजानन बळी, भागवत हटकर, प्रल्हाद पवार, संजय शिर्के, अमोल शिर्के, रमेश बळी, अतीश शिर्के, रेखा बळी, डिगांबर बळी, मंगला बळी, माधुरी उपर, प्रियांका शिर्के, लता सोनवणे, कल्पना गवांदे, गजानन घुगे, ज्योती घुगे, विकास घुगे, नंदा घुगे आणि भागवत गव्हांदे आदी भाविकांचा समावेश आहे.amarnath yatra हा भक्तीचा सोहळा पाहण्यासाठी आणि आपल्या लाडया नातेवाईक व मित्रपरिवाराला निरोप देण्यासाठी संपूर्ण मालेगाव शहरातून भोलेभक्तांनी मोठी उपस्थिती लावली होती. यावेळी हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण मालेगाव शहर शिवसेवेच्या रंगात न्हाऊन निघाले होते.