नागपूर,
Kavikalguru Kalidas मैत्र समूहातर्फे कवीकुलगुरू कालिदास यांच्या स्मरणार्थ विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार, १२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता धंतोली येथील मेजर सुरेंद्रदेव पार्क येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमात महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार मंदार मोरोणे हे 'मेघदूत' या कालिदासांच्या अजरामर काव्यातील मेघाच्या प्रवासाचे विविध आयाम, त्यावरील संशोधन, भारतीय मान्सून आणि प्रत्यक्ष प्रवासातील अनुभव याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. 'मेघदूत' हे केवळ प्रणयकाव्य नसून त्यामागील साहित्यिक, भौगोलिक आणि संशोधनात्मक पैलू उलगडण्याचा प्रयत्न या व्याख्यानातून होणार आहे.
कार्यक्रमाला डॉ. सना पंडित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.Kavikalguru Kalidas तसेच कवयित्री चित्रा कहाते, जयश्री दाणी, अनुजा तातावार, निमा बोडखे आणि अरुंधती वैद्य या पावसावरील कविता सादर करणार आहेत. डॉ. मानसी सगदेव आणि डॉ. सुमेधा हर्षे या ऑनलाइन सहभागी होणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता सदावर्ते करतील.
सौजन्य :डॉ.अरुंधती वैद्य ,संपर्क मित्र