मुंबई
mumbai pune railway route मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून त्याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असले तरी मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.
अचानक गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता यावे यासाठी आगाऊ माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 10 जुलै ते 17 जुलै या कालावधीत दररोज धावणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या कालावधीत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 17317 हुबळी-दादर एक्सप्रेस, 17318 दादर-हुबळी एक्सप्रेस, 22944 इंदूर-दौंड एक्सप्रेस, 22943 दौंड-इंदूर एक्सप्रेस, 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हैदराबाद एक्सप्रेस, 22731 हैदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12124 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन, 12123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे डेक्कन क्वीन, 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे डेक्कन एक्सप्रेस, 11008 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस, 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, 12128 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस, 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल आणि 22158 चेन्नई एग्मोर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट मेल यांचा समावेश आहे.
याशिवाय वेगवेगळ्या तारखांना mumbai pune railway route धावणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (10 ते 17 जुलै), 17412 कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस (9 ते 17 जुलै), 20495 जोधपूर-हडपसर एक्सप्रेस (10 ते 17 जुलै), 20496 हडपसर-जोधपूर एक्सप्रेस (11 ते 17 जुलै), 11028 सातारा-दादर एक्सप्रेस (11, 13 आणि 14 जुलै), 11027 दादर-सातारा एक्सप्रेस (10, 12, 13 आणि 17 जुलै), 11041 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (9, 11, 14 आणि 15 जुलै) तसेच 11042 साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस (10, 12, 15, 16 आणि 17 जुलै) यांचा समावेश आहे.
विशेष गाड्यांपैकी 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस (10 ते 17 जुलै), 01080 गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (12 ते 17 जुलै), 01415 पुणे-गोरखपूर एक्सप्रेस (10 ते 15 जुलै), 01416 गोरखपूर-हडपसर एक्सप्रेस (11 ते 16 जुलै), 01431 पुणे-गाझीपूर सिटी एक्सप्रेस (10 आणि 14 जुलै), 01432 गाझीपूर सिटी-हडपसर एक्सप्रेस (12 आणि 16 जुलै), 01491 पुणे-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (10 जुलै) आणि 01492 हजरत निजामुद्दीन-पुणे एक्सप्रेस (11 जुलै) या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लोणावळा-कर्जत मार्ग पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेची टीम अहोरात्र काम करत आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहेत. रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.प्रवाशांनी गाड्यांच्या धावण्यासंदर्भातील ताज्या माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधावा किंवा एनटीईएस ॲप तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडिया माध्यमांवरही वेळोवेळी अपडेट्स दिले जात आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.