अकोल्याचा‘मास्टर पॉवर स्विमिंग क्लब’चा झोनल चॅम्पियनशिपमध्ये डंका

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
16 पदकांसह खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी

यवतमाळ, 
Master Power Swimming Club नुकत्याच पार पडलेल्या झोनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाèया ‘मास्टर पॉवर स्विमिंग क्लब’च्या जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या विभागीय स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंनी तब्बल 16 पदकांची कमाई करत झोनल चॅम्पियनशिपमध्ये डंका वाजवला आहे. या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत उत्कृष्ट टायमिंगची नोंद करत विरोधकांना मागे टाकले व पदकांची लयलूट केली. रुद्र संजय पवार याने त्रिशतकी सुवर्ण कामगिरी केली. त्याने 50 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर फ्री स्टाईल व 50 मीटर बटर स्ट्रोक या तिन्ही प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. पार्थ राम राठोड याने 25 मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण पदक, तर 50 मीटर फ्री स्टाईल व 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये रजत पदक पटकावले.
 
 
swiming
 
 
सक्षम राहुल इंगळे याने 25 मीटर व 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक व 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रजत पदक पटकावले. अनुज आशिष पनपालिया याने 25 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक व 50 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक अशा दोन्ही प्रकारांत सुवर्ण पदक जिंकले. तसेच 25 मीटर फ्री स्टाईलमध्ये रजत पदक आपल्या नावावर केले.
लावण्या गणेश कटारे हिने मुलींच्या गटात अकोल्याचा दबदबा निर्माण करत 25 मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण पदक, 25 मीटर बॅक स्ट्रोक गाठत रजत पदक व 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. प्रणव प्रशांत गवई या छोट्या जलतरणपटूने आपल्या कौशल्याने सर्वांना थक्क केले. त्याने अत्यंत कठीण समजल्या जाणाèया 200 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.

कोच योगेश अनंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन
खेळाडूंना या यशासाठी मुख्य प्रशिक्षक नॅशनल कोच योगेश अनंत पाटील यांचे मार्गदर्शन व कडक प्रशिक्षण लाभले. योगेश पाटील यांनी प्रत्येक खेळाडूच्या कौशल्यावर विशेष लक्ष देऊन, त्यांच्याकडून मेहनत करून घेतली. दिलेल्या तंत्रशुद्ध टिप्समुळेच अकोल्याच्या या मुलांनी यवतमाळमध्ये अकोला जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.