केंद्रीयमंत्री शिवराजसिंग यांचे खा. काळे यांनी मानले आभार

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
आर्वी,
mp kale केंद्र व राज्य शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांकडून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करुन सुद्धा दुसर्या हप्त्याचे वितरण तांत्रिक बाबींमुळे अडले होते. घरकुलधारक लाभार्थी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आल्याने खासदार अमर काळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांची भेट घेऊन अडचणी दूर करुन तत्काळ दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्याची मागणी केली होती. ती मागणी पुर्ण झाल्याने खा. अमर काळे यांनी कृषिमंत्री चव्हाण यांची भेट देऊन आभार मानले.
 
 
 
 
mp काळे
 
 
घरकुलधारकांना प्रथम हप्त्याचे वाटप झाले. प्रथम त्यानंतर घरकुलधारकांनी घरकुल बांधावयास सुरुवात केली. बर्याच घरकुलधारकांनी अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची वाट न पाहता उसणवारीने पैसे घेऊन घरकुलाचे काम पूर्ण केले. शासनाकडून दुसरा हप्ता मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. उसनवारीच्या पैशासाठी तगादा लावल्या जात होता. या सर्व अडचणीमुळे घरकुलधारक त्रस्त झाले होते. खा. अमर काळे यांनी याबाबत प्रशासनाकडे माहिती घेतली असता वर्ककोड जनरेट न झाल्याने दुसरा हप्ता मिळाला नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, खा. काळे यांनी १३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांना माहिती दिली. केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी या बाबीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही केली. वर्धा जिल्ह्यातील ५८४ घरकुलधारकांचे वर्ककोड जनरेट झाले असून अनुदान वाटपातील दुसर्या हप्त्याचे वितरण सुध्दा झाले आहे. त्यामुळे खा. अमर काळे यांनी कृषिमंत्री चव्हाण यांचे आभार मानले.