अज्ञात व्यक्तीकडून चार युवतींचे अकरावीचे ऑनलाइन प्रवेश अर्ज
मानोरा पोलिसांत तक्रार, तांत्रिक तपास सुरू
दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मानोरा,
online class admission उच्च शिक्षण घेत असलेल्या चार युवतींच्या नावाने त्यांच्या परवानगीशिवाय अकरावीचे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून मानोरा येथील सुभद्राबाई पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमठाणा येथील नेहा विनोद खुपसे (वय २३), अंजली विलास पुरी (वय २२) तसेच आसोला खुर्द येथील विशाखा संतोष राठोड व पायल राजू भोरकडे (वय २०) यांनी ८ जुलै रोजी मानोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, नेहा खुपसे हिने २०२० मध्ये दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत सध्या एम.एस्सी.चे शिक्षण सुरू ठेवले आहे.
अंजली पुरी हिने २०१९ मध्ये दहावी उत्तीर्ण होऊन सध्या एम.ए.चे शिक्षण सुरू केले आहे. तर विशाखा राठोड व पायल भोरकडे यांनी दहावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.चारही युवतींनी शिक्षणाच्या प्रवासात अकरावी प्रवेशासाठी कोणताही ऑनलाइन अर्ज भरलेला नसताना, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून मानोरा येथील सुभद्राबाई पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले.online class admission हा प्रकार जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.