ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांना मानधन मिळणार

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
-दिव्यांगांसाठी वयोमर्यादा शिथिल

नागपूर, 
’rajarshi shahu maharaj jyeshtha sahityik v kalakar mandhan sanman yojana’ राज्य शासनाच्या ’राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रतिमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी महाराष्ट्र शासनाच्या हींींी://ररश्रशीरीज्ञरी.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर २१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मात्र, दिव्यांगांसाठी वयाची अट १० वर्षांनी शिथिल करण्यात आली असून त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे. अर्जदाराचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असावे. तसेच त्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातलेली असावी.
 
 
योजनेंतर्गत वयाने ज्येष्ठ, एकल, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. त्याचप्रमाणे कलाकारांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून असणे आवश्यक आहे. कलाकार केवळ कलेवरच अवलंबून असणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नसलेले कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाची महामंडळे अथवा इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार यासाठी पात्र ठरणार आहेत. कलाकार, साहित्यिक हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी मुदतीत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी, नागपूर तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय समिती, नागपूर यांनी केले आहे. ऑनलाइन अर्जासाठी वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), राज्य अथवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था अथवा व्यक्तीचे शिफारसपत्र (लागू असल्यास) तसेच विविध पुरावे आदी कागदपत्रे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.