1.68 लाखांच्या रेशमी साडीत रश्मिका मंदानाचा रॉयल अंदाज

चाहत्यांकडून लूकची जोरदार चर्चा

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई
rashmika mandanna अभिनेत्री रश्मिका मंदानाचा नवा रॉयल लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. एका खास प्रसंगासाठी रश्मिकाने प्रसिद्ध डिझायनर मृणालिनी राव यांनी डिझाइन केलेली आयव्हरी रंगाची रेशमी साडी परिधान केली होती. या साडीची किंमत अंदाजे ₹1,68,000 असल्याचे सांगितले जात आहे.
 

rashmika mandanna stuns in ₹1.68 lakh ivory silk saree with royal traditional look 
आयव्हरी रंगाच्या सिल्क साडीत रश्मिकाचा लूक अत्यंत राजेशाही आणि आकर्षक दिसत होता. साडीच्या काठावर केलेली नाजूक जरीची फुलांची नक्षी आणि त्यासोबत परिधान केलेला गडद लाल रंगाचा हाताने भरतकाम केलेला ब्लाऊज या संयोजनामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला पारंपरिकतेसह एलिगंट असा विशेष साज लाभला.या रॉयल साडीसोबत रश्मिकाने जड दागिन्यांना फाटा देत साधेपणाची निवड केली. तिने हिरव्या खड्यांचे झुमके, गळ्यात केवळ मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि एक स्टायलिश घड्याळ असा दागिन्यांचा साज परिधान केला होता. साधेपणातूनही रॉयल लूक कसा साकारता येतो, हे तिने पुन्हा एकदा आपल्या स्टाइलमधून दाखवून rashmika mandanna  दिले.मेकअपच्या बाबतीतही रश्मिकाने मिनिमल लूक कायम ठेवला. हलके स्मोकी आयज, नैसर्गिक ग्लो, ओठांवर सौम्य लाल रंगाची लिपस्टिक आणि मध्यभागी भांग काढून बांधलेले केस यामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता. कपाळावरील सिंदूराने तिच्या संपूर्ण पारंपरिक लूकला आणखी उठाव मिळाला. रश्मिकाचा हा आकर्षक आणि रॉयल अंदाज पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले असून सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.