नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj भु-वैकुंठ समितीने अड्याळ टेकडी हडप करण्याच्या कथित प्रयत्नांविरोधात पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. अड्याळ टेकडी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याशी निगडित ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा असून, ग्रामगीतेच्या विचारांची प्रयोगशाळा असल्याचा दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
लोकसहभाग आणि श्रमदानातून गीताचार्य तुकाराम दादांनी या स्थळाची निर्मिती केल्याचे सांगत, टेकडीचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. Rashtrasant Tukadoji Maharaj न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, अड्याळ टेकडीवर कोणतेही अतिक्रमण अथवा दिशाभूल करणारे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.या प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरातील गुरुदेव सेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन टेकडीच्या संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सौजन्य :ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र