लिलावाआधीच संजू सॅमसनचा धक्का!

टी-२० लीगमध्ये खेळणारच नाही

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Sanju Samson's unexpected decision संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीगच्या तिसऱ्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ११ जुलै रोजी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी त्याने आपले नाव नोंदवले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तो या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.श्वचषकातील भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजू सॅमसनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता. मात्र त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या दोन आणि इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. परिणामी त्याला अंतिम अकरामधून वगळण्यात आले. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही त्याची निवड झाली नाही.

samju 
 
केरळ क्रिकेट लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावात एकूण १५६ खेळाडू सहभागी होणार आहेत. मात्र या यादीत संजू सॅमसनचे नाव नसणार आहे. यापूर्वी त्याच्या कोची ब्लू टायगर्स संघाने त्याला मुक्त केले होते. त्यामुळे तो पुन्हा लिलावात उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र संजूने या हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्याने केरळ क्रिकेट असोसिएशनला दिली आहे. मागील हंगामात कोची ब्लू टायगर्सने संजू सॅमसनला तब्बल २६.८० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. त्यामुळे तो त्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. यंदाचा केरळ क्रिकेट लीगचा तिसरा हंगाम २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या कालावधीत भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असला, तरी संजू कसोटी संघाचा भाग नाही. त्यामुळे त्याने लीगमधून माघार घेण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.