बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई
security guard राज्यातील बाल निरीक्षण गृहांमधील सुरक्षा रक्षकांच्या एकूण २८८ मंजूर पदांपैकी तब्बल ७० पदे रिक्त असल्याची माहिती विधानसभेत समोर आली आहे. सद्यस्थितीत केवळ २१८ पदांवरच कर्मचारी कार्यरत असून, उर्वरित पदे भरण्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात भूमिका स्पष्ट केली.
 

security guard vacancies in maharashtra child observation homes raise concerns 
विधानसभा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला असता, मंत्री तटकरे यांनी सांगितले की, प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दरात सुरक्षा रक्षक उपलब्ध होण्यास किंवा काम करण्यास इच्छुक नसल्यास, अशा रिक्त जागांसाठी बाह्यsecurity guard  यंत्रणेमार्फत (आउटसोर्सिंग) सुरक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा व्यवस्थेत खंड पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या कार्यरत असलेल्या २१८ सुरक्षा रक्षकांना शासन निर्णयानुसार प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दिले जात असून, यासाठी दरमहा सुमारे ३९ लाख २४ हजार रुपयांचा खर्च शासनाकडून केला जातो, असेही मंत्री तटकरे यांनी नमूद केले.