चुलत मामानेच केला भाचीवर लैंगिक अत्याचार

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
sexual-assault-on-niece-by-uncle : बाराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे चुलत मामानेच लैंगिक शोषण केले. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मिडियावर व्हायरल करण्याचे धमकी देऊन तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केले. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी तिच्या मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
 
NGP
 
 
 
आरोपी हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील आहे. तो नागपुरात कामाच्या शोधात आला होता. त्याची चुलत बहिण नागपुरात राहते. त्याने बहिणीच्या वस्तीतच खोली घेतली आणि भाड्याने राहायला लागला. बहिणीच्या घरी येत-जात होता. जून २०२२ मध्ये चुलत बहिणीच्या तिच्या बाराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर त्याची वाईट नजर पडली. त्याने तिच्याशी जवळिक साधली. तिला जाळ्यात ओढल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो-व्हिडिओ आईवडीलांना दाखविण्याची धमकी देऊन तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. तसेच तिच्यावर सलग चार वर्षे लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या मनावर विपरित परिणाम होत होता. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्यामुळे ती नैराश्यात गेली. तिने घडलेली घटना आईला सांगितली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.