मुंबई
shailesh lodha daughter ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत अनेक वर्षे ‘तारक मेहता’ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेते शैलेश लोढा सध्या त्यांच्या लेकीच्या विवाहामुळे चर्चेत आहेत. त्यांची मुलगी स्वरा लोढा हिचा राजस्थानमधील जोधपूर येथील उमेद भवन पॅलेसमध्ये भव्य विवाहसोहळा पार पडला. या शाही लग्नसोहळ्याला अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली.
स्वराने शाश्वत यांच्याशी विवाह केला असून ते पेशाने सिंगापूरस्थित बँकर आहेत. ते कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा ग्लॅमर विश्वाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. अभिनय किंवा मनोरंजन क्षेत्राशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही.
स्वरा आणि शाश्वत shailesh lodha daughter दोघेही आपले खासगी आयुष्य सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवणे पसंत करतात. लग्नाआधीही या दोघांचे फार कमी फोटो सार्वजनिक झाले होते. याउलट शैलेश लोढा हे टीव्ही क्षेत्रासोबतच कविता मंचाच्या विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे.शैलेश लोढा यांची मुलगी स्वरा ही स्वतः एक लेखिका असून तिने आई डॉ. स्वाती लोढा यांच्यासोबत मिळून ‘54 Reasons Why Parents Suck’ हे पुस्तक लिहिले आहे. याशिवाय स्वरा ही गायिकाही आहे. युट्यूबवर तिच्या बँडसोबत गायलेले एक गाणे उपलब्ध आहे. मात्र, ती नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.स्वरा आणि शाश्वत यांचा विवाहसोहळा दोन ठिकाणी पार पडला. मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये पहिला विवाहसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला. त्यानंतर राजस्थानमधील उमेद भवन पॅलेसमध्ये तीन दिवसांच्या शाही सोहळ्यात दोघांनी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली.