खर्च कमी करून ५७ लाख किलोमीटरने बस फेर्यांमध्ये केली वाढ
बुलढाणा,
ST Corporation Buldhana एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीमध्ये बुलढाणा विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत बुलढाणा विभागाने तब्बल ५७ लाख किलोमीटरने बस फेर्यांमध्ये वाढ केली असून, एकूण उत्पन्नात ४६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे योग्य नियोजन आणि चालक-वाहकांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विभागाचा नफा मागच्या वर्षीच्या १० कोटींवरून थेट २२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रवाशांना उत्तम सेवा दिल्याने यंदा तब्बल ११ लाख प्रवाशांची वाढ झाली आहे.
दि. १ जून रोजी एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय येथे वर्धापन दिनानिमित्त विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांचा सन्मान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला आहे. विभाग नियंत्रकाचे नियोजन व मार्गदर्शनानुसार प्रवाशी किलोमीटरमध्ये झालेली वाढ कमी खर्चात होती. त्यामुळे उत्पन्न वाढले. ५७ लाख किलोमीटरची वाढ करण्यात आली चालक वाहक यांच्या कर्तव्यामुळे प्रत्येकी दहा किलोमीटर वाढ झाल्याने ११ लाख प्रवाशी जोडल्या गेले. अशी माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाचे़ वाहतूक अधिकारी दिंगबर जाधव यांनी दिली आहे.