नाशिक,
Thackeray falls ill in Nashik नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे १० ते १२ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा समोर आल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, शिंदे सेनेकडून सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या महिन्यात ठाकरे गटाचे सहा खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर काही आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनाही शिंदे सेना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू होती. आता नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतरामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, काही नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्या असून, त्यामध्ये पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी होणार आणि त्यामध्ये नेमके कोणते नगरसेवक सहभागी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू आहेत.
या संभाव्य पक्षांतरामागे प्रत्येक प्रभागासाठी ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दाखविण्यात आल्याचीही चर्चा आहे. तसेच ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याचाही शिंदे सेनेशी संपर्क असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संघटन विस्तारासाठी शिंदे सेनेकडून हालचालींना वेग आल्याचेही बोलले जात आहे.सध्या नाशिक महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकूण १५ नगरसेवक आहेत. त्यापैकी १० ते १२ नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आणि महापालिकेतील गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठे खड्डे, पाणी साचणे आणि इतर नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले. नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठे खड्डे, पाणी साचणे आणि इतर नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले.