मुंबई
the one force मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द वन’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. यासोबतच चित्रपटाचा दमदार नवा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला असून त्यातून या भव्य सिनेमॅटिक विश्वाची खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आता ‘द वन’ हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नव्या पोस्टरमध्ये एक शक्तिशाली योद्ध्यासारखा नायक बैल आणि वाघाच्या मधोमध उभा असल्याचे दिसत आहे. रहस्य, सामर्थ्य आणि संघर्षाची भावना निर्माण करणारा हा पोस्टर चित्रपटाच्या कथानकातील महत्त्वाच्या संघर्षाची झलक देतो. अनेक प्रतीकांनी सजलेला हा पोस्टर भारतीय लोककथांवर आधारित या चित्रपटाच्या गूढ विश्वाची उत्सुकता आणखी वाढवतो. पोस्टरमधील आकर्षक रचना, बारकावे आणि चित्रपटाची भव्यता यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चाहत्यांनीही या पोस्टरमधील कलात्मकतेचे आणि त्यातील सूक्ष्म तपशीलांचे कौतुक केले आहे.
भव्य थिएट्रिकल अनुभव देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला ‘द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा भारतीय लोककथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. फॅन्टसी, अॅक्शन, कॉमेडी आणि अॅडव्हेंचर यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट दमदार वर्ल्ड बिल्डिंग आणि अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. भारतीय संस्कृतीशी आणि मातीशी जोडलेल्या कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे.
सध्याच्या काळात रिमेक, अॅडॉप्टेशन आणि फ्रँचायझी चित्रपटांची संख्या वाढत असताना ‘द वन’ पूर्णपणे नवीन विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरातील लोकप्रिय फॅन्टसी विश्वांप्रमाणे हा चित्रपट केवळ एका कथेपुरता मर्यादित न राहता स्वतःची पात्रे, प्रतीके आणि लोककथांवर आधारित एक विस्तृत फोकलोर विश्व उभारण्याचा प्रयत्न करतो. निर्मात्यांनी याआधी ‘द लिजेंड ऑफ वन’ या कॉमिक बुकच्या माध्यमातून या मोठ्या विश्वाची पहिली झलक सादर केली होती, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
बालाजी मोशन पिक्चर्स आणिthe one force टीव्हीएफ मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जाणारा हा चित्रपट दीपक कुमार मिश्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नव्या रिलीज डेटसह प्रदर्शित करण्यात आलेल्या दमदार पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा विभाग असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्स, टीव्हीएफ आणि 11.11 प्रॉडक्शन प्रस्तुत ‘द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा भारतीय लोककथांवर आधारित भव्य चित्रपट आहे. चित्रपटाची कथा अरुणाभ कुमार यांनी लिहिली असून दिग्दर्शनाची जबाबदारी दीपक मिश्रा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल डायरेक्शन मनू आनंद यांनी केले आहे. शोभा कपूर, एकता आर कपूर, अरुणाभ कुमार आणि नीरज कोठारी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.