विवेकानंद विद्यालयात उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली पाहणी

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
विद्यार्थ्यांशी साधला सुसंवाद

वणी, 
Vivekananda Vidyalaya तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयालयात यवतमाळ जिप माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक व विस्ताराधिकारी स्मिता घावडे यांनी आकस्मिक भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
 
 
pahanoi
 
विद्यालयात आगमनानंतर मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांच्या समवेत विविध वर्गांना भेट देण्यात आली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गणित व इतिहास विषयांवरील प्रश्न विचारून त्यांच्या अध्ययनाची पडताळणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन व शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थिती नोंदी, शिक्षक हजेरी पुस्तक, शाळेची सुरक्षा व्यवस्था, तक्रारपेटी, बाहेरगावाहून येणाèया विद्यार्थ्यांची नोंद, वाहनचालकांचे परवाने व आवश्यक कागदपत्रे तसेच विज्ञान प्रयोगशाळेची तपासणी करण्यात आली.
 
 
उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक यांनी शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र परिधान करण्याबरोबरच शासनाचा ‘सखी सावित्री’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक असल्याचे आढळून आले. शाळेतील शिस्त, व्यवस्थापन तसेच विविध नोंदवह्यांची योग्य देखभाल याबाबत उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक व विस्ताराधिकारी स्मिता घावडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रवीकांत गोंडलावार, सोनाली ठाकूर, कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे, मधुकर कोडापे तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.