वर्धा,
wardha ats operation पाकिस्तानातील शहजातभट्टी गँगच्या सतत संपर्कात असल्याने अर्धा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील एकाला नागपूर व वर्धा येथील एटीएस पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार शहजाद भट्टी हा भारतातीलच काही लोकांना हेरून त्यांच्यावर जाळे फेकण्याचे काम गेला अनेक दिवसांपासून करीत आहे. या संदर्भातील माहिती एटीएसला कळल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यात एकाच वेळी धाडसत्र सुरू केले. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास वर्धा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात नागपूर व वर्धा येथील एटीएस पथकातील पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले.wardha ats operation वृत्तलिहीस्तोवर त्याची कसून तपासणी सुरू होती. दरम्यान वडनेर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातही एकाला सकाळी सहा वाजता ताब्यात घेण्यात आले होते. परंतु, फक्त मोबाईल सिम कार्ड चा वापर केल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई वर्धा व नागपूर येथील एटीएसच्या आठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.