वर्धा,
Wardha: Attack Incident चाकूने प्राणघातक हल्ला करणारा आरोपी कर्मवीर लाजने रा. समतानगर वर्धा याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी दोषी ठरवून सहा महिन्यांची सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
स्थानिक सिव्हील लाईन भागातील एका लॉनमध्ये आयोजित लग्न सोहळ्यात कर्मवीर लाजने याने तक्रारकत्र्याचा पुतण्या लखन कांबळे व एकांत पंडीत यांना चाकूने प्राणघातक हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू शासकीय अभियोक्ता गिरीष तकवाले यांनी मांडली