मागील सभेच्या इतिवृत्ताचा मुद्दा गाजला
वर्धा,
Wardha Municipal Council वर्धा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवार १० रोजी सुरू होताच नगरसेवकांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा मुद्दाच विषय सुचित नसल्याचा आरोप करीत सभा रद्द करण्याची मागणी एकमुखाने केली. त्यानंतर सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सभेच्या अनुषंगाने नागरिकांनी निवडूण दिलेले आणि स्विकृत नगरसेवकांना ही लेखी माहिती देण्यात आली होती. नप सभागृहात सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेच्या विषय सूचित मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा मुद्दा नसल्याचा आरोप केला. पहिले मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा मुद्दा विषय सूचित समाविष्ट करा नंतरच सर्वसाधारण सभा घ्या असे म्हणत सभा रद्द करण्याची मागणी केली. जवळपास अर्धातासाच्या गदारोळानंतर सभा रद्द करण्यात आली.