मानोरा,
soybean crop damaged तालुक्यातील अमरगड (वाई गौळ) येथील महिला शेतकरी मालाबाई देवराव राठोड यांच्या महामार्गालगतच्या शेतातील तीन एकर सोयाबीनचे पीक वन्य प्राण्यांनी पूर्णपणे उध्वस्त केल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गट क्रमांक ५५ मधील या शेतात सोयाबीनची पेरणी नुकतीच झाली होती. मात्र, वन्य प्राण्यांच्या कळपाने रात्रीच्या सुमारास संपूर्ण पीक फस्त करून शेत भुईसपाट केले. सकाळी शेतावर गेल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच महिला शेतकर्याला धक्का बसला. पेरणीसाठी बियाणे, खते, मजुरी यावर मोठा खर्च झाला असून,आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.soybean crop damaged नुकसानग्रस्त शेतकरी मालाबाई राठोड यांनी प्रशासनाने तात्काळ शेतीचा पंचनामा करून आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. वनविभाग व कृषी विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही शेतकर्यांतून होत आहे.