लैंगिक संबंधासाठी सावत्र मुलावर महिलेची बळजबरी

- आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
crime-news : सावत्र आईने आपल्याच साडेसतरा वर्षांच्या मुलाला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. त्याने नकार दिल्यास खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली. ही बाब मुलाने काकूला सांगितली. काकूच्या तक्रारीवरुन तहसील पोलिसांनी सावत्र आईविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला.
 
 
 
NGP
 
 
 
पीडित मुलगा राजू (काल्पनिक नाव) बी.ए. प्रथम वर्षाला शिकत आहे. तो सावत्र आईसोबत राहतो. त्याच्या आईच्या निधनानंतर वडिलाने दुसरे लग्न केले. लग्न केल्यानंतर काही महिन्यांमध्ये त्याच्या वडिलाचे निधन झाले. त्यामुळे सावत्र आई त्याचा सांभाळ करेल, या आशेने नातेवाईकांनी राजूला तिच्यासोबत ठेवले. मात्र, काही दिवसांतच ती राजूशी अश्लील वर्तन करायला लागली. तो वारंवार विरोध करीत होता. मात्र, त्या महिलेने राजूशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजू तिच्याशी संबंध ठेवण्यास नेहमी नकार देत होता. त्यामुळे ती त्याला शिवीगाळ करुन मारहाण करीत होती. अनेकदा मार सहन केल्यानंतरही तो तिला संबंधासाठी नकार द्यायचा. त्यामुळे चिडलेल्या महिलेने त्याला संबंध न ठेवल्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसविणार, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलाने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी ही बाब आपल्या काकूला सांगितली. काकूने त्या महिलेशी चर्चा केली असता ती शिवीगाळ करायला लागली. त्यामुळे मुलाला घेऊन तहसील पोलिस ठाण्यात पोहचली. पोलिसांनी तक्रारीवरुन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.