अभाविपतर्फे अहेरी येथे ‘यशवंत विद्यार्थी सत्कार’ उत्साहात संपन्न

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
आलापल्ली,
yashwant vidyarthi satkar अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) 78 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून अभाविप अहेरी नगरच्या वतीने राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे ‘यशवंत विद्यार्थी सत्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘ज्ञान-शील-एकता’ या त्रिसूत्रीच्या प्रेरणेने राष्ट्रभक्त, चारित्र्यसंपन्न आणि समाजाभिमुख विद्यार्थी घडविणार्‍या जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास अभाविपचे गडचिरोली विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. धर्मेंद्र मुनघाटे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. चिनन्ना चालूरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अभाविप अहेरी नगर मंत्री विष्णू रापर्तीवार तसेच अहेरी नगर अध्यक्ष आदेश मंचालवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
यशवंत विद्यार्थी सत्कार’ उत्साहात संपन्न
 
प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इतिहास, कार्य आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली. तर डॉ. चिनन्ना चालूरकर यांनी विद्यार्थी जीवनातील आव्हाने, शिक्षण, करिअर आणि यशस्वी भविष्यासाठी आवश्यक गुण याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.yashwant vidyarthi satkar कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याबरोबरच शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रसेवेचा संदेश दिला