अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बुलढाणाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य स्तरावर खेळांमध्ये बक्षिस मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने शुक्रवार, दि. १० जुलै रोजी गर्दे वाचनालयात सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
 
 
abvp
 
जिल्हा संयोजक व्यंकटेश जुनारे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी विदर्भ प्रांत मेडिव्हिजन सह संयोजक सौरभ जोशी व बुलढाणा जिल्हा संयोजक व्यंकटेश जुनारे बुलढाणा जिल्हा विस्तारक ऋषभ गोहणे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.