आंदोलनाची दखल न घेतल्यास जेल भरो छेडणार : पंजाबराव गायकवाड
बुलढाणा,
anganwadi sevika mahila elgar थकीत कोरोना भत्ता व निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे या प्रमुख स्थानिक मागण्यांना घेऊन १ जुलै पासून जिल्हाभर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सिटूच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात सातत्याने महिलांनी बेमुदत आंदोलन केले.
दि.१० जुलै रोजी जिल्हाभर याच प्रमुख मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली मेहकर, मोताळा, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा, संग्रामपूर, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या तालुयातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी आणि स्त्री परिचर महिलांनी आपल्या न्याय मागण्यासाठी तालुयातील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर २३ महिन्याचा कोरोना भत्ता मिळालाच पाहिजे बीएलओ, एस आयआर निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे कर्मचार्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे किमान वेतन आमच्या हक्काचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून ग्रॅज्युटी देण्यात यावी, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी लागू झालाच पाहिजे इत्यादी मागण्यांच्या बाबत प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. सरकारने या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर १० ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरावर एक मोठे जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा सीटूचे जिल्हा पंजाबराव गायकवाड यांनी प्रशासनाला दिला.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा पाटील, मंदा डोंगरदिवे वनमाला वानखेडे, जयश्री तायडे, ललिता बोदडे, रश्मी दुबे, सीमा सुरूशे, सुमित्रा लिहिणार ,स्वाती आहेर, शारदा खोडके, सावित्री कोकाटे, रंजना मोरखडे, माया वाघ, वैशाली चाहकर, सुवर्णा लाटे, स्वाती वायाळ, अनिता कदम ,सीमा शेळके, वैशाली राणे, सविता चोपडे, इत्यादी सह विविध तालुयातील प्रमुख पदाधिकार्यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स व गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या.