वाटमारी करणार्या एकास अटक; दुसर्याचा शोध सुरू

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
arrested for highway robbery बुटीबोरी-तुळजापूर मार्गावरील सेलडोह शिवारात वाटमारी करणार्या दोघांपैकी एकाला स्थानिक पोलिसांनी दोन तासात अटक केली. फरार दुसर्याचा शोध सुरू आहे. पोलिस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सेलडोह येथील उड्डाण पुलाजवळ प्रणय तेलंग व त्याच्या मित्राने नागपूरवरून दुचाकीने येणार्या निशांत सूर्यवंशी आणि मित्र कुणाल गोहणे यांना अडवले. शाब्दिक बाचाबाचीनंतर दोघांनाही मारहाण करून त्यांच्याकडील ११ हजारांचे दोन भ्रमणध्वनी हिसकावले. शिवाय त्यांच्या खिश्यातून ३२ हजार रुपये काढून पळ काढला.
 
 
atak
तक्रार प्राप्त होताच पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे आणि चमुने शोधकार्य सुरू करून आमगाव येथील प्रणय तेलंग खडकी येथील एका हॉटेलमधून अटक केली. त्याची झडती घेऊन रोख ३२ हजार व दोन्ही मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक निस्वादे, पोलिस उपनिरिक्षक ज्ञानोबा पळनाटे, ओम कलेगुरवार, प्रफुल्ल डफ, सचिन नखाते आदींनी केली.