वर्धा,
ATS inquiry underway महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी वर्धेत ४० वर्षीय इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याचे समाजमाध्यमांवर पाकिस्तानात सक्रिय असलेल्या कथित आयएसआय हँडलर आणि गुंड शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्याचा कोणत्याही देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
(संग्रहित छायाचित्र )
मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या समाज माध्यमांच्या माध्यमातून संशयिताचे संबंध उघड झाले. काल शुक्रवारी दिवसभर चाललेल्या चौकशीदरम्यान, एटीएस अधिकार्यांनी त्याची सोशल मीडिया खाती आणि इतर डिजिटल हालचालींची तपासणी केली. तो देवळी तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासानंतर, पुढील चौकशी आणि तांत्रिक तपासासाठी त्याला रात्री नागपूर येथे हलवण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.