ग्राहक नव्हे तर तंत्रज्ञानाचे निर्माते बना : भार्गव

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
बजाज विज्ञान महविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
 
वर्धा, 
Bajaj Science University येथील विद्यार्थ्यांनी इतरांपेक्षा वेगळे असणे आणि स्वतःमधील सुप्त गुणांना ओळखणे गरजेचे आहे. आजच्या युगात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे केवळ ग्राहक न राहता, त्याचे निर्माते झाले पाहिजे, असे मार्गदर्शन शिक्षा मंडळाचे अध्यक्ष संजय भार्गव यांनी केले. बजाज कॉलेज ऑफ सायन्समध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थी राजेंद्र भट्टड मुख्य अतिथी म्हणून तर प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे आणि उपप्राचार्य संजय नाखले उपस्थित होते.
 
 
 
bajaj
संजय भार्गव यांनी अकरावीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षा मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायन्स ऑलिम्पियाडमध्ये १६०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी एचएससी, जेईई आणि एमएचटीसीईटी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संचालन अर्चना दंडारे यांनी केले. उपप्राचार्य संजय नाखले यांनी आभार मानले.