भरधाव चारचाकीच्या धडकेने पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
बोरीचंद्रशेखर :
Borichandrashekhar Accident बोरीचंद्रशेखर येथे पायदळ वाटेने घराकडे जाणारा युवराज ठाकरे याला रात्री सुमारे 8 वाजताच्या दरम्यान अंदाजे स्विफ्ट डिझायर या भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेने युवराजचा जागीच मृत्यू झाला.
 
 
bori
 
ही माहिती मिळताच, आरोग्यसेवक अविनाश क्षीरसागर, लखन शर्मा, सतीश शेटे, पीयूष तिवारी, अभिषेक बोकडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी दारव्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.