बसच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर, 
Bus-Bicycle Accident भरधाव बसची धडक बसून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 11 जुलै रोजी सकाळच्या सुमारास येथील तुकूम परिसरातील पोलिस सभागृहासमोर घडली. विनायक गंगाधर पराते (53, रा. तुकूम) असे मृतकाचे नाव आहे.
 
 
acc
 
विनायक पराते हे आपल्या सायकलने जात असताना, अचानक आलेल्या बसने (एमएच 40 एन 9429) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात, विनायक पराते हे बसच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच रामनगर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे. दरम्यान, रस्त्यांवर ऑटो, व्यापार्‍यांचे चारचाकी वाहन ऐन रस्त्यावरच उभे राहत असल्याने येथे सातत्याने अपघात होत आहेत. वाहतूक नियंत्रण विभागाचे याकडे अजिबात लक्ष नसल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.