वृक्षमित्र परिवारातर्फे ३०० वृक्ष लागवडीचा शुभारंभ

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट, 
Concepts of tree plantation वृक्षमित्र परिवारातर्फे ठरविण्यात आलेल्या ३०० वृक्षांच्या लागवडीच्या संकल्पनाचा पहिला टप्पा रामनगर वार्ड येथील बुद्धविहार रोड श्री सुपर शॉपीच्या समोर संरक्षण भिंत असलेल्या मोकळ्या जागेवर ३० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रणाली सायंकार, स्मीता बोंडे, समाज सेवक उमेश तुळसकर स्थानिक नगर सेवक विक्की वाघमारे, समाज सेवक मनीष देवढे, तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी सतीश वखरे यांची उपस्थिती होती.
 
 
plantation
यावेळी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी वृक्षारोपणाचे पर्यावरणीय व आरोग्यासाठीचे महत्त्व सांगितले. भौतिक साधनाच्या अति वापरामुळे पर्यावरणाची समस्या अधिक जास्त प्रमाणात होत असून त्यासाठी अधिक झाडं लावणे व जमिनीत पाणी मुरण्यासाठी वॉटर रेन हार्वेस्टिंग करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. त्याचवेळी त्यांनी नपच्या मालकीच्या ३०० रोपं वृक्ष मित्र या संघटनेला देण्याचे जाहीर केले. डॉ. प्रणाली सायंकार यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नगरसेवक धनंजय बकाने, बंटी वाघमारे, दिनेश वर्मा, नितेश नवरखेडे, अतुल नंदागवळी, सुरज कुबडे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन गोपाल मांडवकर यांनी केले तर नितीन क्षीरसागर यांनी आभार मानले.
 
यशस्वीतेकरिता दीपक जोशी, शुभम घोडे, दर्शन बाळापुरे, मोहन पेरकुंडे, सुरेंद्र टेंभुर्णे, अजय कापसे, जयंत वखरे, सतीश गौळकार, उमेश डेकाटे, सचिन येलकुंचेवार, देवा जोशी, गौरव बोंडे, संदीप जोशी, अभय दांडेकर, प्रशांत माथनकर, कैलास मसराम, प्रदीप मुके, राजू चांभारे, सुजल मानकर यांनी परिश्रम घेतले.