कौशल्य विकास योजनेत डॉ. संतोष पुसदकर यांचा सन्मान

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Datta Meghe Medical College नगर युवक शिक्षण संस्थेच्या दत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर येथे आयुष मंत्रालय पुरस्कृत 'चॅम्पियन सर्व्हिस सेक्टर स्कीम फॉर स्किल डेव्हलपमेंट' अंतर्गत आयोजित क्षार कर्म तंत्रज्ञ प्रशिक्षण कार्यक्रमात आयुर्वेदाचार्य डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
 

top 
 
या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. पुसदकर यांनी प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना क्षार कर्म तंत्रज्ञानाचे सैद्धांतिक ज्ञानासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. Datta Meghe Medical College  आयुर्वेद व शल्यकर्म क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि प्रशिक्षणातील मोलाच्या योगदानाची दखल घेत संस्थेच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सोनाली वैरागडे आणि शल्यचिकित्सक तथा आयुष समन्वयक डॉ. प्रफुल फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी नगर युवक शिक्षण संस्थेचे सचिव रविजी मेघे तसेच प्राचार्या डॉ. हर्षला राजूरकर शर्मा यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र डॉ. पुसदकर यांना प्रदान करण्यात आले.
सौजन्य:सारंग टोपरे,संपर्क मित्र