मधुमेहाच्या रुग्णांना आठवड्यातून एकदाच घ्यावे लागेल इन्सुलिन

भारतीय बाजारपेठेत आले जगातील पहिले बेसल इन्सुलिन ४० टक्के स्वस्त असेल डोस

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
diabetic patients डेन्मार्कची औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने भारतात ॲविक्ली (इन्सुलिन आयकोडेक) जारी केले. हे जगातील पहिले आठवड्यातून एकदा दिले जाणारे बेसल इन्सुलिन आहे. जे टाइप-१ आणि टाइप-२ मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांसाठी आहे. याच्या आगमनाने दररोज घ्यावे लागणारे ३६५ इन्सुलिन वर्षाला ५२ पर्यंत कमी होतील, असा कंपनीचा दावा आहे.
 
Insulin
 
कंपनीनुसार, ॲविक्लीचा उद्देश भारतात इन्सुलिन सुरू करण्यात होणारा विलंब कमी करणे हा आहे. दररोज इंजेक्शन घेण्याची भीती रुग्णांमध्ये इन्सुलिन थेरपी सुरू करण्यात सर्वात मोठा अडथळा आहे. ज्यामुळे सरासरी सात ते नऊ वर्षांचा विलंब होतो, असे नोवो नॉर्डिस्कचे म्हणणे आहे. कंपनीने ७०० युनिट्सचे पॅक २६११ रुपयंमध्ये जारी केले आहे. म्हणजेच, याची किंमत प्रति युनिट ३.७३ रुपये असेल. ती सध्याच्या दैनंदिन बेसल इन्सुलिनच्या तुलनेत ३० ते ४० टक्के स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे. जर एखाद्या रुग्णाला दररोज १० युनिट्स इन्सुलिनची गरज असेल, तर त्याला आठवड्यात ७० युनिट्स इन्सुलिन लागेल. ज्याची किंमत प्रति आठवडा सुमारे २६१ रुपये असेल.
 
 
भारतात सुमारे १०.१ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर १३.६ कोटी लोक प्री-डायबिटीजच्या स्थितीत आहेत. देशात नऊ लाखांहून अधिक लोक टाइप-१ मधुमेहाने प्रभावित आहेत, ज्यांच्या उपचाराचा मुख्य आधार इन्सुलिन आहे. तर टाइप-२ मधुमेहाच्या सुमारे १० टक्के रुग्णांनाही इन्सुलिन थेरपीची गरज पडते. हे इन्सुलिन पेन डिव्हाइसद्वारे आठवड्यातून एकदा दिले जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की यामुळे उपचाराचा भार कमी होईल, रुग्णांची औषध घेण्याची नियमितता वाढेल आणि इन्सुलिन थेरपी सुरू करण्यातील संकोचही कमी होईल.
 
कंपनीनुसार, भारतात सध्या सुमारे ६० लाख लोक इन्सुलिन थेरपी घेत आहेत, तर किमान दुप्पट लोकांना त्याची गरज असू शकते. ही संख्या वाढून ९० लाखांपर्यंत पोहोचली, तर ही रुग्णांची गरज पूर्ण करण्यासाठी आणि कंपनी दोघांसाठीही मोठे यश असेल. भारतात इन्सुलिन घेणारा प्रत्येक दुसरा रुग्ण नोवो नॉर्डिस्कने तयार केलेल्या ब्रँडचा वापर करतो, असे नोवो नॉर्डिस्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिया यांचे म्हणणे आहे.
  
पेन डिव्हाइसद्वारे आठवड्यातून एकदा लावले जाईल
ॲविक्लीची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची स्पर्धात्मक किंमत आहे. हे सध्याच्या दैनंदिन बेसल इन्सुलिनच्या जवळ आहे, ज्यामुळे हे तंत्रज्ञान केवळ निवडक लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही. वैद्यकीय चाचण्यांमध्ये या औषधाने अनेक प्रकरणांमध्ये दैनंदिन बेसल इन्सुलिनच्या बरोबरीने किंवा त्याहून चांगले रक्तातील साखरेचे नियंत्रण दर्शवले आहे, असे मधुमेह विशेषज्ञ डॉ. राजीव कोविल म्हणाले.