नवी दिल्ली,
former congress mlas sentence upheld मध्यप्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र भारती यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्या. मनोज जैन यांनी बँक फसवणूक प्रकरणात न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळत कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली तीन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. या शिक्षेमुळे त्यांना आपले सदस्यत्वही गमवावे लागले होते़.
२८ एप्रिलला राजेंद्र भारती यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर ९ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. ७ एप्रिलला न्यायालयाने मध्यप्रदेश सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती. याचिकेत राजेंद्र भारती यांनी दोषसिद्धीच्या आदेशाला स्थगिती देण्याची आणि निवडणूक आयोगाला दतिया विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी न करण्याचा निर्देश देण्याची मागणीही केली होती. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, तर याचिकाकर्त्याच्या राजकीय कारकिर्दीला गंभीर धक्का बसेल, असे याचिकेत म्हटले हाेते.