टाकळी (निधा) गावात ‘ती’ आहे... ‘प्रकाश’ नाही

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
आजनसरा, 
Gram Panchayat poles light off गेल्या एक महिन्यापासून टाकळी निधा या गावावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ग्रापंच्या इले्ट्रिरक खांबांवरील बल्ब बंद असल्याने संपूर्ण गाव रात्री काळोखात बुडत आहे. गावात वीज आहे. पण, उजेड नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टाकळी (निधा) हे गाव यशोदा नदीच्या तिरावर वसले आहे.
 
light band
 
नदीकाठच्या जंगलातून साप, विंचू आणि इतर वन्यप्राणी थेट वस्तीत शिरत आहेत. अंधारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्येबाबत गावकर्यांनी ग्रामसेवकांकडे वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या. अनेकांनी फोन सुद्धा केले. परंतु, ग्रामसेवक फोन उचलत नसल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. ग्रामसेवकांनी एक-दीड महिन्यांपासून गावात पायही ठेवला नाही. त्या फक्त कागदोपत्री टाकळीच्या ग्रामसेवक आहेत. त्यामुळे वीज आहे, पण लाईट नाही. ग्रामसेवक आहेत, पण गावात नाहीत, अशी स्थिती दिसून येत आहे. गावातील पथदिवे सुरू करण्यात यावे, ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही गावकर्यांकडून केली जात आहे.