वर्धा,
homeopathy chikitsa karyashala होमिओ मेडिकल असोसिएशन ऑफ वर्धा द्वारा डॉ. हॅनिमन स्मृतिदिनानिमित्त होमिओ चिकित्सकांसाठी कार्यशाळेचे आयोजन व सामाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता ढोबळे होत्या तर निसर्गसेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांची उपस्थिती होती.
शहराचा मागासलेल्या भागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे होमिओपॅथीच्या प्रचार-प्रसार योजनेत सहभाग घेणारे नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगूळ, डॉ. भीमनवार, दामोदर राऊत, हरीश मन्ने, अरविंद देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. येत्या काळात आदिवासी कॉलनी, रामनगर, सिव्हिल लाईन, लॉयड्स स्टील, बोरगाव (मेघे) येथे आरोग्य केंद्राची सुरुवात होईल, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्ता कुंभारे यांनी सांगितले. मुरलीधर बेलखोडे यांनी प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयाजवळ वृक्ष संगोपन करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी होमिओ चिकित्सा कार्यशाळेद्वारा आयोजन करणारे डॉ. पंकज निमजे यांचे स्वागत केले. संचालन शुभांगी निमकर यांनी केले. आभार डॉ. मिलिंद वासेकर यांनी मानले.
यावेळी हरिभाऊ वझुरकर, श्रीकांत बाराहाते, अभ्युदय मेघे, अरविंद देशमुख, हरीश मन्ने, डॉ. रवी देशमुख, डॉ. प्रशांत खातदेव, डॉ विनय डहाके, डॉ. सुचित्रा कुर्वे, डॉ. माया डोळस, डॉ. मंदाकिनी तळवेकर, डॉ. अश्विनी साहू, डॉ. शिरीष ठाकरे आदींची उपस्थिती होती.