अर्धवट नियोजनामुळे पुन्हा फोडाफोड

खर्चाचा बोजा कोण उचलणार ?

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Incomplete planning एलएडी कॉलेज चौक ते श्रद्धानंदपेठ चौक या रस्त्याच्या मध्यभागातून मागील महिन्यात पाईपलाईन टाकण्यात आली. या कामासाठी तब्बल दीड महिना रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर केवळ मधला भाग सिमेंट काँक्रीटने भरून काढण्यात आला, तर उर्वरित रस्ता डांबरीच ठेवण्यात आला.
 
 

cement 
 
 
या कामातील नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करायचा असल्यास पुन्हा रस्ता फोडावा लागेल.Incomplete planning त्यामुळे नव्याने टाकलेल्या पाईपलाईनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाईप बदलणे किंवा दुरुस्ती करणे आवश्यक ठरल्यास त्यावर अतिरिक्त खर्च होणार आहे.जर भविष्यातील विकास आराखडा लक्षात घेऊन याच वेळी संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला असता, तर पुन्हा फोडाफोड, वाहतुकीचा त्रास आणि सार्वजनिक निधीचा अतिरिक्त खर्च टाळता आला असता. विकासकामांमध्ये विविध विभागांमध्ये समन्वय आणि दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता या उदाहरणातून पुन्हा अधोरेखित होते.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र