मिलिटरी स्कूलचा प्रवीण कुलाल फायरिंगमध्ये अव्वल

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
पुलगाव,
pravin kulal स्थानिक इंडियन मिलिटरी स्कूल, एनसीसी (राष्ट्रीय सेवा योजना)चा कॅडेट प्रवीण सखाराम कुलाल याने नुकत्याच झालेल्या थल सेना कॅम्पमध्ये इंटर बटालियन फायरिंग स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले.
 

pravin kulal 
 
 
जगातील सर्वात मोठ्या युवा युनिफॉर्म संघटन असलेल्या एनसीसीचे दहा दिवसीय थल सेना शिबिर अरविंद इंडो पब्लिक स्कूल, हेटी (सुरला) सावनेर येथे पार पडले. यामध्ये २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धाचे प्रतिनिधित्व करणार्या प्रवीणने फायरिंग या प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करीत आयजीसी (इंटर ग्रुप कॉम्पिटिशन) मध्ये आपले स्थान निश्चित केले. तो आता १६ ते २५ जुलै दरम्यान अमरावती येथे होणार्या दहा दिवसीय इंटर ग्रुप एनसीसी शिबिरामध्ये नागपूर ग्रुपचे प्रतिनिधित्व करणार आहे.pravin kulal इंटर ग्रुप स्पर्धेत यश प्राप्त करणार्या कॅडेट्सला २६ जानेवारी २०२७ रोजी दिल्ली येथे होणार्या २६ प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचा गौरव प्राप्त होतो. जो एनसीसी मधील सर्वोच्च सन्मान समजला जातो.
या यशाकरिता त्याचे इंडियन मिलिटरी स्कूलचे कमांडंट कर्नल के. एच. पाटील, मुख्याध्यापक रवीकिरण भोजने, पर्यवेक्षक नितीन कोठे, एनसीसी अधिकारी प्रवीण शेळके, तथा शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले. प्रवीणने आपल्या यशाचे श्रेय २१ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल के. जिसंतो, सुभेदार मेजर दिलबाग सिंग, आदींना दिले आहे.