वैद्यकीय महाविद्यालयासह वीज पुरवठा प्रश्नावर आ. झनक आक्रमक

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
अधिवेशना मांडले विविध मुद्दे
 
रिसोड, 
MLA Amit Zanak रिसोड व मालेगाव तालुक्यातील बहुतांश वीजपुरवठा एकाच सबस्टेशनवर अवलंबून असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रिसोड शहर आणि रिसोड ग्रामीण अशी स्वतंत्र दोन सबस्टेशन उभारण्यात यावीत, जेणेकरून शेतकर्‍यांना मुबलक व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होईल तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर आ. झनक यांनी आक्रमक भुमीका घेतली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर सबस्टेशनचे विभाजन करून करंजी येथे नवीन सबस्टेशन उभारण्यात यावे, त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्ना मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल, हा मुद्दाही मांडला.
 
 
Zanak
 
वाशीम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पाबाबतही प्रश्न उपस्थित केला. पैनगंगा नदीपर्यंत पाणी पोहोचल्यास रिसोड व वाशीम तालुक्यात नैसर्गिकरित्या जल उपलब्धता वाढून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असे निदर्शनास आणून दिले. केनवड येथील खराटे परिवारावर विजेच्या धक्क्यामुळे ओढवलेल्या दुःखद दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ११ केव्ही वीज वाहिन्यांचे टप्प्याटप्प्याने एबी केबलद्वारे रूपांतर करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील, अशी मागणी केली. वाशीम येथे मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालय सोबतच नर्सिंग कॉलेजलाही मंजुरी देण्यात यावी, जेणेकरून जिल्ह्यात कुशल आरोग्य मनुष्यबळ तयार होईल आणि स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, अशीही शासनाकडे मागणी केली.