निसर्गमित्र चव्हाण यांना छ. शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
मानोरा, 
nisargmitra nikhil chavhan तालुक्यातील माहुली येथील निसर्गमित्र निखिल हरिदास चव्हाण यांना २४ या वर्षाचा राज्याचा अमरावती विभागीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. महसूल व वन विभागाने ९ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
 
 
 nikhil chavhan
 
निसर्गप्रेमी निखिल चव्हाण हे मागील १० वर्षांपासून वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, बीजसंकलन आणि पक्षी संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि बीजसंकलनाबत जनजागृती केली आहे. तसेच विविध वृक्षाचे बीज संकलित करून सिडबॉल तयार करण्याचा उपक्रम सातत्याने राबविला असून, पर्यावरण संवर्धनाला चालना दिली आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्याची दखल शासनाने घेतली. पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी निखिल चव्हाण यांच्या या सन्मानाबद्दल अभिनंदन केले आहे.