पुलगाव,
Pulgaon Hooliganism पुलगाव शहर काही वर्षांपूर्वी गावगुंडांमुळे बदनाम झाले होते. त्यावेळी जिल्हास्तरावर एका कडक पोलिस अधिकार्याची नियुक्ती झाली आणि त्यांनी या तथाकथित गुंडांच्या दादागिरीवर आणि गुंडगिरीवर कठोर कारवाई केली. त्यावेळच्या गुंडांना तुरुंगाची हवा खायला लावल्यामुळे पुलगाव शहर गुंडगिरीपासून मुक्त झाले होते. परंतु, १० रोजी रात्री महेश झेरॉक्ससमोर अज्ञात तरुणांनी २ तरुणांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरला आणि पुन्हा एकदा नवीन पिढीतील तरुण गुंडगिरीचे सावट पुलगावकरावर घोंगावत असल्याचे दिसून आले.
लोकांमध्ये आपली दादागिरी आणि दशहत कायम राहावी म्हणून पुन्हा एकदा गावगुंडांनी डोके वर काढल्याचे शहरात एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आले आहे. शुक्रवारी रात्रीच्या महेश झेरॉक्स समोर अज्ञात तरुणांनी दोघांना बेदम मारहाण केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे भीतीमुळे मार खाणार्या तरुणाला सोडवणे तर दूरच पण थांबून बघण्याचीही हिंमत कोणात नव्हती.