नागपूर,
Ramkrishna Wagh College शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी सप्ताहानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, सर्व शाखांचे विभागप्रमुख प्रा. दीपक ठाकरे आणि वाणिज्य विभागप्रमुख प्रा. किरण पांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कुणाल बोरकर आणि भूगोल विभागप्रमुख प्रा. पूनम मेश्राम यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करताना, "पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन केले.Ramkrishna Wagh College या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. मारोती वाघ तसेच संस्थेच्या संचालिका प्राचार्या डॉ. लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सौजन्य:सायली लाखे ,पिदळी /संपर्क मित्र