लेख ...
विकासक खरे बंधूंची देदीप्यमान यशस्वी वाटचाल
Sameer Khare - Sachin Khare अडथळ्यांची शर्यत ही आयुष्याची रीत आहे. प्रत्येक पराभवाच्या मागे यशाची जीत आहे. तुझ्या स्वप्नांना पंख देऊन तू उडत राहा, हार न मानता तू नेहमी लढत राहा...! या कवितेच्या ओळी वाचताच डाेळ्यासमाेर येतात शून्यातून विश्व साकारणारे मध्य भारतातील क्रिकेटपटू आणि श्री कन्स्ट्रक्शनचे संचालक सचिन अशाेक खरे...!!
(समीर खरे - सचिन खरे )
नावाप्रमाणे बांधकाम व्यवसायात खरेपणा टिकवणारे सचिन खरे ‘सत्य वचन हेच प्रत्यक्ष वर्तन’ याच बळावर आज यशाेशिखरावर विराजमान आहेत. मुळात अष्टपैलू क्रिकेटपटू असलेले सचिन खरे लढवय्या वृत्तीचे, बाणेदारपणा जपणारे, स्वाभीमानी अन् दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. बांधकाम क्षेत्रात समाजभान जपणारे सहृदयी विकासक अर्थात् बिल्डर म्हणूनही सचिन खरे ओळखले जातात. रणजी क्रिकेटपर्यंत मजल गाठलेल्या सचिन खरे यांना सरकारी नाेकरी सहजतेने मिळत हाेती. मात्र, त्यांनी सुरक्षित क्षेत्र साेडून असुरक्षित अशा आव्हानात्मक क्षेत्रात वयाच्या 18 व्या वर्षी प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ते धाडस आपला मुलगा सचिन करीत असल्याचे पाहता खरे कुटुंबीयांनी त्यांना प्राेत्साहित केले.
एकीकडे कुटुंबीयांची माैल्यवान साथ, तर दुसरीकडे अक्कलकाेट स्वामी समर्थांचा ‘भिऊ नकाेस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा आशीर्वाद पाठिशी असल्याने सचिन खरे यांची बांधकाम क्षेत्रातील वाट खराेखरच प्रशस्त झाली. त्याकरिता त्यांनी प्रामाणिकपणा जाेपासला. दिलेला शब्द पाळला, वेळेबाबत शिस्त आणि प्रत्येकाचा आदर मनापासून केला. बाेले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले । ताेची साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।। ही संतवाणी त्यांनी लहानपणी ऐकली हाेती. त्यानुसार त्यांनी आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे मनापासून समाधान केले. जे म्हटले ते कार्य पूर्ण करून दिले. प्रत्येकाच्या अपेक्षा आणि इच्छांची पूर्तता कशी करायची यावर भर दिला. सूक्ष्म निरीक्षण, आपलेपणाची भावना, प्रत्येकाचा सन्मान राखत व्यवसायातील बारकावे आत्मसात केले. सर्व खाचखळगे कळल्यानंतर त्यांनी इमारत बांधकाम क्षेत्रात सन 2009 मध्ये पाय ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा चारही बाजूला प्रचंड स्पर्धा हाेती. हक्काच्या घरासाठी सामान्य माणसे दाराेदार हिंडत हाेते. त्या लाेकांची व्यथा पाहता सचिन खरे यांनी बांधकाम क्षेत्रातही सच्चेपणा, प्रामाणिकपणा, साेज्वळता, सर्जनशीलता, मनाचा हळवेपणा, ग्राहकांचे हित जाेपासले. मध्य भारतात तेव्हा तर मराठी माणूस चाकरी करण्यातच धन्यता मानायचा. ताेच पायंडा माेडून काढत नवी वाट प्रशस्त करण्याचा राजमार्ग सचिन खरे यांनी निवडला हाेता. ताे राजमार्गही प्रशस्त झाला अन् ते या क्षेत्रातील राजा अर्थात सामान्यांसाठी दर्जेदार घर देणारे आधुनिक विश्वकर्मा ठरले. ‘लग्न करावे पाहून अन् घर पहावे बांधून’ अशी म्हण आजही प्रचलित आहे. कारण या दाेन्ही गाेष्टी खराेखरच कठीण आहेत.
पण, कठीण गाेष्टीलाही जाे साेपी करताे ताेच खरा शूरवीर ठरताे. सचिन खरे यांनी असाच शूरवीरपणा दाखवित सामान्यांना घराच्या रूपात जी काही सुख-समृद्धी मिळवून दिली ते चमत्कारिक आहे. जेव्हा सचिन खरे यांनी रिअल इस्टेट व्यवसायात उडी घेतली तेव्हा स्थिती ारच बिकट हाेती. स्पर्धेत एक उद्याेजक म्हणून मराठी माणूस कुठेही दिसत नव्हता. अशावेळी सचिन खरे यांनी आपल्यातील कर्तबगारी सिद्ध करीत कतृर्त्वाला कल्पकतेची जाेड देत अद्भूत कार्य या क्षेत्रात करून दाखविले. श्रीकृष्णाने आदेश दिल्यानंतर भगवान विश्वकर्मा यांनी द्वारका उभारली. त्याच भगवान श्रीकृष्णाच्या रंजक कथा बालपणापासून ऐकल्याने सचिन खरे यांच्यावर सर्वाेत्तम असे संस्कार घडले. तेच संस्कार कायम ठेवत तारुण्यात आल्यावर उदयास आला यशस्वी मराठी उद्याेजक. आज बांधकाम क्षेत्रात सचिन अशाेक खरे यांच्या श्री कन्स्ट्रक्शनचे एक ब्रॅण्ड नेम आहे. भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरातील मराठी युवकाने एवढी उत्तुंग झेप तेही बांधकाम क्षेत्रात घ्यावी, हाही अनेकांना चमत्कार वाटताे. हा चमत्कार दिसत असला तरी त्यामागे सचिन खरे यांची प्रचंड मेहनत दडलेली आहे.
घराचे स्वप्न मनात घेऊन आलेल्या व्यक्तीला व्यवस्थित समजावून सांगत माफक दरात देऊ केलेली अत्युत्तम सेवा हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. त्यांच्याकडून ज्यांनी सदनिका, घरे, भूखंड घेतले ते स्वत:ला खूप भाग्यवान समजतात. आम्हाला एवढा चांगला विकासक अर्थात् बिल्डर मिळावा याचेच आश्चर्य आणि काैतुक वाटते. हा सचिन खरे यांच्याविषयी व्यक्त केलेला विश्वास ग्राहकांकडून मिळालेले प्रशस्तीपत्र पद्मश्री पुरस्कारापेक्षा कमी नाही. तसे पाहता दुनिया खूप विचित्र आहे. पैशाला नमस्कार करणारे लाेक आहेत. म्हणूनच ‘निर्धन गिरे पहाड सें, काेई न पुछे हाल । धनी काे लगे कांटा । पुछें लाेग हजार ।।’ अर्थात् श्रीमंतांना सर्व लाेक विचारतात. गरीबांचा तर विचारही केला जात नाही. मात्र, सचिन खरे यांच्या श्री कन्स्ट्रक्शन कंपनीची भूमिका ही पूर्णत: ‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ अशीच आहे. सचिन खरे सांगतात, आम्ही गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचाच विचार हृदयापासून करताे अन् त्यानुसारच घरांचे स्वप्न साकारले जाते.
स्वस्तात घरे देण्याची कल्पना केवळ मनात न ठेवता त्यांनी ती प्रत्यक्षात साकारली. आम्ही माणसांना जपताे अन् त्यांना दिलेला शब्द कटाक्षाने पाळताे. कारण, आमच्यासाठी घराचे स्वप्न घेऊन आलेला ग्राहक हाच खरा देव असताे. आपण देवाला नाराज करताे का? मग ग्राहकरूपी देवाला नाराज कशाला करायचे. ताे ग्राहकरूपी देव प्रसन्न झालाच पाहिजे, अशीच भक्तीरूपी कृती आम्ही करताे. याच कारणाने आम्ही सुमारे 500 पेक्षा जास्त लाेकांना दर्जेदार आणि खिशाला परवडणारी घरे देण्यात यशस्वी ठरलाे. सन 2009 ते 2026 या 17 वर्षांच्या काळात 40 प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा बहुमान आमच्या नावाने आहे. जे म्हटले ते दिले म्हणूनच लाेक हसले असेही सहजतेने सचिन खरे सांगून गेले. पाण्यापेक्षा तहान किती आहे, याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जाेडतात, पण नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. आम्ही त्यानुसार वागताे अन् ईश्वररूपी ग्राहकांचा विश्वास जपताे. शब्द पाळा, माणसांना जपा याच बळावर आम्ही यशस्वी ठरलाे अन् पुढेही ग्राहकांना जपण्यावरच आमचा भर राहील, अशीही प्रांजळ भूमिका सचिन खरे यांनी मांडली.
बांधकाम क्षेत्रातील देदीप्यमान घाेडदाैड पाहता सचिन खरे यांना मानद डाॅक्टरेट पदवीनेही सन्मानित केले आहे. याशिवाय इतरही नामांकित संस्थांनी त्यांचा यथाेचित गाैरव केला आहे. कमी पैशात शासकीय घरकुल अधिक टुमदार आणि दर्जेदार कसे हाेईल याचाही एक मास्टरप्लॅन त्यांच्याकडे आहे. समजा ताे मास्टरप्लॅन महाराष्ट्र शासनासह इतरही राज्यांनी स्वीकारला तर संपूर्ण भारतात घरकुल याेजना नंबर वन ठरेल. पुणे शहरातही काही प्रकल्पावर त्यांचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, सचिन खरे साेबत काम करणाèया लाेकांनाही जपतात. त्यांच्याही आयुष्यात आनंद संचारावा, सुख-समृद्धी यावी म्हणून सढळ हाताने मदत करतात. शेवटी, मनात ठेवा तुम्ही मुलांनाे, सेवेची ही मधुर भावना । मानवतेची सेवा करण्या, उरात ठेवा अपार करुणा ।। ही बाळकडूरूपी शिकवण समीर आणि सचिन खरे यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून विकासकाच्या रूपात लाेकहितवादी बनावे, ही नक्कीच गाैरवपूर्ण बाब म्हणावी लागेल.
कुटुंबाची माैल्यवान साथ हीच जमेची बाजू
मराठी माणसाने व्यवसायात उतरायचे असेल तर खूप काही त्याग करावा लागताे. अशावेळी माझ्या कुटुंबीयांनी मला माैल्यवान साथ दिली. विशेषत: वडील अशाेक खरे, आई अपर्णा खरे, महालेखाकार कार्यालयातील लेखापाल भाऊ समीर खरे तसेच संकेत खरे, पत्नी वैशाली सचिन खरे यांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. त्यांनीच मला शून्यातून माेठे हाेण्यासाठी प्राेत्साहित केले. अक्कलकाेटच्या स्वामी समर्थांची तर माझ्यावर विशेष कृपाच आहे. ‘भिऊ नकाेस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हे त्यांचे वाक्य मला चांगले कार्य करण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच मी लाेकहिताला प्राधान्य देताे. श्री कन्स्ट्रक्शनच्या माध्यमाने आम्ही विटा सिमेंटने इमारत बांधत नाही तर, लाेकांच्या मनातही घर करताे. एवढे आमचे कार्य दर्जेदार आणि आपुलकीने युक्त आहे. अहाे, एखाद्या व्यक्तीने आपल्यासाेबत नेमके कसे वागावे असे आपल्याला वाटते अगदी ताेच ाॅर्म्युला आपण आयुष्यात आलेल्या ग्राहकांच्या संदर्भात लागू करावा. तेव्हाच माणसं जपली जातील अन् नाते विश्वासाचे तयार हाेईल, असे मत श्री कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सचिन अशाेक खरे यांनी मांडले.
सचिन खरे
बांधकाम क्षेत्रातही क्रिकेटपटूंची कमाल
श्री या शब्दातच आदर, समृद्धी दडलेली आहे. म्हणूनच श्री कन्स्ट्रक्शनने उभारलेल्या इमारतीत राहणारी व्यक्ती सुखी, समृद्ध आणि संपन्न राहावी अशाच पद्धतीने आमचे ध्येय राहिले आहे. क्रिकेटमध्ये दाेन सख्खे भाऊ एकाचवेळी फलंदाजीसाठी मैदानावर उतरणे दुर्मिळ प्रसंग ठरताे. आता असाच दुर्मिळ प्रकार मध्यभारतात बांधकाम व्यवसायात घडला आहे. लाेकांच्या स्वप्नातील घर साकारावे म्हणून अस्सल क्रिकेटपटू असलेले दाेन सख्खे भाऊ मैदानात समाजऋण ेडण्यासाठी उतरले आहेत. आपल्या भावाला सहकार्य करायला मिळावे, म्हणून समीर अशाेक खरे यांनी भारत सरकारच्या महालेखाकार विभागातून स्वेच्छा निवृत्ती घेत भाऊ सचिन खरे यांच्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. रणजीपटू समीर खरे अष्टपैलु खेळाडू म्हणून तेव्हा प्रख्यात हाेते. गाेलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्यांचा प्रचंड दबदबा हाेता. प्रतिस्पर्धी खेळाडूला सहजतेने गारद करण्याची त्यांची शैली तेव्हा क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी राहायची. असा यशस्वी क्रिकेटपटू भावासाठी आणि आपल्या हातून लाेकांच्या स्वप्नातील घर पूर्णत्वास जावे याकरिता मैदानात उतरावा, ही बाब नक्कीच काैतुकास्पद म्हणावी लागेल.
समीर खरे
पुणे शहरातही उभारणार इमारती
लाेकहितासाठी सत्य कथन, प्रत्यक्ष वर्तन!
स्वप्नातील घर साकारणारं श्री कन्स्ट्रक्शन!
17 वर्षांत 40 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण
खाजगीसह सरकारी याेजनांमध्येही सहभाग
श्री कन्स्ट्रक्शन कंपनी ठरली ब्रॅण्डनेम
सचिन खरे मानद डाॅक्टरेटने सन्मानित
कमी खर्चात सर्वाेत्तमसह दर्जेदार घर
वेळेच्या आत दिला जाताे ताबा
क्रिकेटपटू समीर खरे यांचीही माैल्यवान साथ
‘ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय’ नुसार कार्य
समाजऋण फेडणारे एसके साेशल फाऊंडेशन
पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीवर तीन ऋण असतात. मातृ ऋण, पितृ ऋण आणि समाजऋण. या तिन्ही ऋणांची परतेड माणसाने करावी. याच उदात्त हेतूने आम्ही समाजऋण फेडण्यास्तव एसके साेशल फाऊंडेशन स्थापन केली आहे. त्यार्माफत हाेतकरू गरजवंत मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात दिला जाताे. देणाऱ्याने देत जावे । घेणाऱ्याने घेत जावे । घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ।। अर्थात विंदा करंदीकरांनी सांगितल्याप्रमाणे आपणही समाजाला काही तरी द्यायला हवे, म्हणूनच आम्ही श्री कन्स्ट्रक्शनच्या अंतर्गत एसके साेशल फाऊंडेशन स्थापन करून गरजवंतांना मदतीचा हात देत आहाेत. एकंदरीत पाहता समाजऋण फेडण्यासाठी पुढे आलेल्या सचिन खरे आणि समीर खरे समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बाेलायचे असल्यास 9823120337 आणि 9225530335 यावर संपर्क साधता येईल.
- अनिल फेकरीकर