वर्धा जिल्हा सहकार भारती मासिक बैठक

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट,
Sant Tukdoji Urban Cooperative Credit Society स्थानिक संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती नागपूर विभाग प्रमुख संजय रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी संस्थागत सदस्य नोंदणी बाबत आढावा घेण्यात आला.
 
 
 
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशातर्फे संस्थागत सदस्य नोंदणीस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत दिलेली उदिष्ट पूर्ण करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. ८ ऑगष्ट रोजी आयोजित चर्चा सत्राची नियोजनात्मक चर्चा बैठकीत करण्यात आली तसेच संस्था सभासद नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात प्रवास करण्याचे ठरविण्यात आले.
संचालन महामंत्री श्यामकुमार खत्री यांनी केले तर आभार जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कोळसे यांनी मानले. बैठकीला तुषार गिरडे, मनोज पाचखेडे, प्रशांत मुळे, भास्कर थोटे, गजानन खाडे, मंगेश दाते, रितेश पिपलवा उपस्थित होते.