राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
आष्टी नगरपंचायतीवर मोर्चा
 
तळेगाव (शा. पंत), 
Streetlights off शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत आष्टी नगरपंचायतीवर भाजपाचे आष्टी तालुका महामंत्री अॅड. मनीष ठोंबरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
 

Streetlights 
 
मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पथदिवेची देखभाल दुरुस्ती आर. आर. कन्स्ट्रक्शन कडून नगरपंचायतकडे घेण्यात यावी, असे पत्र नगरसेवक अॅड. मनीष ठोंबरे यांनी चार महिने आधी देऊन सुद्धा यावर कार्यवाही करण्यात आली नाही. यावर येणार्या मासिक सभेत हा विषय ठेवण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. यावेळी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र, पथदिवे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकत्र्यांनी दिला आहे. यावेळी भाजपाचे चंदू मदनकर, उत्तम बरगे, नरेंद्र भानेरकर, आवेज खान, अक्षय राजुरकर, सौरभ तायडे, सुरेश देशमुख, प्रज्वल हिरुडकर, मंगेश शिरभाते, राहुल कोल्हे, गोपाल चन्ने, ओम किनेकर, राज सरसर, संतोष गुन्हाने, मनीष मोगरे चंदू अष्टणकर व आष्टी शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.