जिप ढाणकी उर्दू विद्यालयाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होणार

    दिनांक :11-Jul-2026
Total Views |
मनसेचा ‘दणका’ : मुख्याधिकारी, शिक्षणाधिकाèयांना निवेदन
तीन सदस्यीय समिती करणार चौकशी

यवतमाळ, 
Zp Dhanki Urdu School जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेस पीएमश्री योजनांमधून प्राप्त झालेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी मनसेला प्राप्त झाल्या आहे. या अनुषंगाने मनसेचे शिष्टमंडळ जिप मुख्याधिकारी व शिक्षणाधिकाèयांना भेटले. गेल्या महिन्याभèयापासून रेंगाळत असलेल्या विषयात मनसेच्या दणक्याने तत्काळ चौकशीचे आदेश मुख्याधिकाèयांनी दिले. या प्रसंगी बोलतांना मनसेचे अनिल हमदापुरे, सादिक शेख यांनी या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेत शिक्षणाधिकारी यांना होणाèया भ्रष्ट कारभाराची माहिती दिली. यावर उपशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी व समकक्ष अधिकाèयांच्या समितीची स्थापना करून चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
 
 
mns
 
या शाळेने 2023-24 या आर्थिक वर्षात योगा व क्रीडा प्रशिक्षणासाठी 1 लाख रुपये ‘21वी सेंच्युरी लर्निंग अ‍ॅन्ड इन्फर्मेशन स्किल्स’ उपक्रमासाठी 1 लाख रुपये नागरिकत्व कौशल्य विकासासाठी 25 हजार 750 रुपये तज्ज्ञ व्यक्तींंचे मार्गदर्शन, परिसंवाद व इतर विविध उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याचे व खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार खर्च दाखविण्यात आलेले अनेक उपक्रम प्रत्यक्षात आयोजित झाले नसल्याचा संशय निर्माण झाला आहे. विशेषतः योग प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन कार्यक्रम व इतर काही उपक्रम प्रत्यक्षात राबविण्यात आले नसताना त्यावर खर्च दाखविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
 
 
याशिवाय विविध प्रशिक्षण कार्यक्रम, साहित्य खरेदी, शालेय विकास कामे व इतर उपक्रमांच्या खर्चाबाबत अभिलेखातील नोंदी व प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये तफावत असल्याची शक्यता आहे. त्याबाबत स्वतंत्र व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. याशिवाय इतर विविध उपक्रम, साहित्य खरेदी, प्रशिक्षण कार्यक्रम व शालेय विकास कामांबाबत देखील अभिलेखातील नोंदी व प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याची शक्यता आहे. त्याची स्वतंत्र व सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. शाळा माध्यमिक पर्यंतची असूनही शाळेचा मुख्याध्यापक पदाचा प्रभार प्राथमिक शिक्षकाकडे देण्यात आला आहे. असे तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारीत संबंधित प्रभारी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी उमरखेड यांना चौकशी प्रक्रीयेत सहभागी करून घेऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
चौकशीदरम्यान निधीचा गैरवापर, अनियमित खर्च, बनावट खरेदी, खोटे व्हाउचर्स याचीसुद्धा शहानिशा करून संबंधित प्रकरणात दोषींनवर आर्थिक फसवणूक व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, जिल्हा मनसेचे अनिल हमदापुरे, तालुकाध्यक्ष सादिक शेख, शेख तय्यब, खालिद, विनोद गायकवाडसह इतर मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.